Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

ठेकेदारांच्या कामाची चौकशी करा – राहुल कोल्हटकर

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: पवना व इंद्रायणी नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी पावसाळ्याआधी जानेवारी ते मार्च महिन्यात ठेकेदारांसाठी निविदा मंजूर केल्या जातात. यासाठी ४ कोटी रुपयांचे जलपर्णी काढण्याचे टेंडर निघाले, कामाची मुदत संपली पण पवना , इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी अजून निघाली नाही.यावर्षी पाऊस उशिरा आला आणि त्यामुळे जलपर्णी वाहून गेली नाही.

शहरात इंद्रायणी, पवना प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यांत सोडले जात आहे. अनेक ठिकाणी नदीपात्रात, नद्यात तसेच नद्यातून जलपर्णी वाहतं जाताना दिसून येते अनेक भागात नदीचे पात्र जलपर्णी ने भरलेले दिसून येते यातून खरच येवढे पैसे खर्च करूनही नद्या जलपर्णी मुक्त होत नाहीत.

याबाबत विशेष दखल घेऊन जलपर्णी काढणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करून कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य पर्यवेक्षक किंवा संबधीत अधिकारी यांना कारणे द्या नोटीस बजावून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.

‘ईडी’ग्रस्त राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये सामील – मानव कांबळे

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू


शिरुरमधील गंगावणे कुटुंबियांचे आमदार महेश लांडगेंकडून सांत्वन

संबंधित लेख

लोकप्रिय