Home News Nashik : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Nashik : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी Demand action against responsible death of Somnath Suryavanshi nashik

नाशिक : परभणी येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या मृत्युच्या घटनेचा तीव्र निषेध असून या घटनेस जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांयांकडे नाशिक जिल्हाधिकारी या़ंच्या मार्फत नाशिक शहरातील संविधान प्रेमी मंच अंतर्गत विविध संस्था – संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. (Nashik)

निवेदनात म्हटले आहे की, संविधान प्रेमी ही नाशिक शहरातील विविध संस्था-संघटना मिळून संविधान संवर्धनासाठी तयार केलेला मंच आहे. आम्ही संविधानातील मुलभूत हक्क, अधिकार यांची जनजागृती करीत असून विविध सरकारी यंत्रणा यांच्या सोबतही कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो.

मागील आठवड्यात परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाला होता. विविध सस्था-संघटनेने या घटनेचे निषेध करीत त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले होते. या वेळी परभणीत काही समाजकटकांनी जाळपोळ, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी काही जनांना ताब्यात घेतले होते. यामध्ये भटक्या विमुक्त समूहातील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) या लॉ ची पदवी शिक्षण घेणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयीन कोठडीत त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. (Nashik)

पोलिसांनी या घटनेवर दावा केला आहे की त्यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे. तथापि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण shock following multiple injuries असे नमूद करण्यात आले आहे. या निष्कर्षावर हे स्पष्ट आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे.

मागण्या पुढीलप्रमाणे : (Nashik)

1) दोषी पोलिसांवर त्वरित कारवाही करण्यात यावी.

2) पिडीत कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत आणि योग्य भरपाई देण्यात यावी.

3) या घटनेचा सखोल तपास करण्यात यावा आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. गुन्हेगार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

4) मस्साजोग, ता. केज, जिल्हा- बीड येथील संतोष देशमुख यांच्या मृत्यूची सखोल चौकशी होऊन गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे.

5) सदर केस अधिक बाबींसाठी मानव अधिकार आयोगाकडे सुपूर्द करण्यात यावी.

निवेदन देतेवेळी कॉ. राजू देसले, अजमल खान, पद्माकर इंगळे, शिवदास म्हसदे, संतोष जाधव, नाझिम काझी, प्रभाकर धात्रक, सुभाष सातपुते, बाबुराव दाणी, भीमराव दाणी, भीमराव गायकवाड, विजय साळवे, सागर भालेराव, जयवंत खडताले, राजेश म्हसदे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा :

सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी

धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप

परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ

ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

Exit mobile version