Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहानगरपालीकेच्या पुष्पगुच्छ उद्यान विभागाचे जाणीवपूर्वक पर्यावरणाकडे दुर्लक्ष

महानगरपालीकेच्या पुष्पगुच्छ उद्यान विभागाचे जाणीवपूर्वक पर्यावरणाकडे दुर्लक्ष

मोठ्या झाडांच्या संरक्षक जाळ्या दोन वर्षांपासून पासून काढण्याची मागणी करुनही जाणीवपुर्वक दुर्लक्ष

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: नवी सांगवी ,पिंपळे गुरव परिसरात अनेक विकास कामे चालू आहेत. शहरात काँक्रिटीकरण वाढत आहे. शेतकऱ्याच्या जमीनी नष्ट होत आहेत.सगळीकडेच वृक्ष लागवडी पेक्षा वृक्षतोडीचे प्रमाण वाढत आहे.पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढिची ऑक्सिजनची सोय म्हणून वृक्षारोपण केले. रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला. वृक्षांना संरक्षण देण्यासाठी १५ वर्षांपूर्वी लावलेल्या लोखंडी जाळ्या झाडे मोठी होऊनही तशाच अवस्थेत राहिल्या व झाडाच्या बूंद्यामध्ये लोखंडी जाळ्या घुसलेल्या आहेत.

काही ठिकाणी जाळ्या तुटलेल्या आहेत, आता मोठ्या झाडांना अशा संरक्षक जाळ्याची आवश्यकता नाही ,यामुळे झाडांची वाढ खुंटलेली आहे, झाडाच्या बुंद्याला इजा झाल्या आहेत असे काही झाडे फेमस चौकाच्या जवळ, गणपती मंदिराच्या समोर आहेत. इतर ठिकाणचे अशा प्रकारची झाडे पालिकेने शोधून मोठ्या गोलाकार जाळया काढाव्यात म्हणजे झाडाची वाढ होऊन झाडे मोकळा श्वास घेतील .अशा प्रकारची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी उद्यान प्र.अधिक्षक गोरखनाथ गोसावी यांच्याकडे दोन वर्षांपासून अनेकदा प्रत्यक्ष भेटून व तीनदा निवेदन देऊन केली .



भेटल्यावर फक्त जाळी काडू म्हणून सांगतात. अनेक वेळा वर्तमानपत्रातून बातम्या ही प्रसिद्ध झाल्या पण उद्यान विभागची यावरून काम करण्याची किती तत्परता आहे यावरून दिसुन येते. पण आजून किती दिवस लागतील हेही सांगत नाही .”सरकारी काम सहा महीने थांब” ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते. जर या पंधरा दिवसांत त्यांनी संरक्षक जाळ्या काढल्या नाहीत तर आम्ही सर्व कार्यकर्ते पुष्पगुच्छ ऊद्यानासमोर उपोषण करु असा इशारा त्यांनी निवेदनातून जोगदंड यांनी दिला. पण काहीही उपयोग झाला नाही, फक्त पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लाखो झाडे लावून पालीका प्रसिद्धी करते पण झाडांची होणारी अडचण त्यांची संरक्षण जाळ्या कधी काढणार असा प्रश्न जोगदंड यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उद्यान विभागाला विचारला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय