Saturday, April 20, 2024
Homeजिल्हाअक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करा – डावी लोकशाही आघाडीची जिल्हाधिकारी...

अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करा – डावी लोकशाही आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

नांदेड : शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंढार तर्फे हवेली येथे तारीख एक जून रोजी बौध्द युवक अक्षय भालेराव याचा स्वर्णांच्या गुंडानी चाकूने भोसकून निर्घृन खुन केला आहे.या घटनेच्या निषेधार्ह डावी लोकशाही आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने दि.५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

या निर्घृण खूनाच्या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरले असून घडलेली घटना खूपच गंभीर व दुःखद आहे. अक्षय च्या मारेकऱ्यांना कठोरात शिक्षा करावी ही प्रमुख मागणी सह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत. डावी लोकशाही आघाडी भालेराव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे या निर्घृण कृत्याच्या पार्शवभूमीवर आकाश आणि भालेराव कुटुंबियांना पोलिसांनी संरक्षण पुरविले पाहिजे. हत्या झालेला युवक घरातील कर्ता मुलगा होता या प्रसंगाच्या परिणामी या कुटुंबियांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. राज्य शासनाने भालेराव कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत केली पाहिजे, सदर कुटूंबास कायमस्वरूपी उपजीविकेचे साधन उपलब्ध करून द्यावे. फरार असलेल्या आरोपीना तात्काळ अटक करा.पीडित कुटुंबियांच्या जीवितास आरोपी कडून धोका असल्याने सदर आरोपीस जमानत मिळणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाने घ्यावी.या गुन्हेगारी कृत्यामुळे गावातील वातावरण दूषित होऊ शकते यातून आणखी अनर्थ होऊ नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे.तसेच गावातील सर्व जातीमधील जनतेला सोहर्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, भालेराव कुटुंबियांचे नांदेड शहरात पुनर्वसन केले पाहिजे. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

सदरील निषेध निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, भाकपचे जिल्हा सचिव कॉ.ऍड.प्रदीप नागापूरकर, जनता दल सेक्युलर चे सूर्यकांत वाणी व डॉ.पी.डी. जोशी पाटोदेकर, माकपचे कॉ. विनोद गोविंदवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, कॉ.अंकुश अंबुलगेकर, कॉ.मंजुश्री कबाडे, कॉ.दिगंबर घायाळे, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. लता गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.मीना आरसे, कॉ.शंकर बादावाड, कॉ.पवन जगदमवाड, कॉ. जय येंगडे, रुख्मिणीबाई गिते, कॉ.मारोती केंद्रे, कॉ. सोनाजी कांबळे, कॉ.गंगाधर मेडकर, कॉ. सुभाषचंद्र गजभारे, कॉ.गंगाधर खुणे, कॉ.संतोष शिंदे आदींनी केले आहे.

या निदर्शने आंदोलनात डावी लोकशाही आघाडीचे घटक पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनता दल (सेक्युलर) आदींनी सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती माकप सचिव तथा डावी लोकशाही आघाडीचे समन्वयक कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

 हे ही वाचा :

आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन; अमित शहांनी केली “ही” विनंती..

निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

पुण्यात 11वी LGBTQ अभिमान पदयात्रा यशस्वीरित्या संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय