Monday, May 13, 2024
Homeराज्यTrade Union : भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी भाजपा महायुतीला पराभूत करा; राजकीय राज्यस्तरीय...

Trade Union : भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी भाजपा महायुतीला पराभूत करा; राजकीय राज्यस्तरीय परिषदेचे आवाहन

मुंबई : भारताची लोकशाही टिकवायची असेल, हुकुमशाही रोकायची असेल आणि सर्वसामान्य जनतेला खरा न्याय मिळवून द्यायचे असेल, महागाईला गडून सामान्य लोकांचे जगणे सुकर करायचे असेल तर या लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीच्या सर्वच उमेदवारांना पराभूत करा आणि लोकशाहीला बळकटी देणाऱ्या उमेदवारांना विजयी करा, असा एल्गार महात्मा गांधी सभागृह परेल मुंबई येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीची राज्यस्तरीय राजकीय परिषद करण्यात आला. काल ही परिषद पार पडली. यावेळी शेकडो कामगार कर्मचारी उपस्थित होते. Defeat the BJP grand alliance to save Indian democracy; Trade Union Joint Action Committee

यावेळी मंचावर सीटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड, INTUC अध्यक्ष डॉ.कैलास कदम, जनरल सेक्रेटरी गोविंद मोहिते, AITUC उदय चौधरी, AICCTU अध्यक्ष उदय भट, BKSM जनरल सेक्रेटरी संतोष चाळके, HMS अध्यक्ष निवृत्ती धुमाळ, NTUI मिलिंद रानडे तसेच सीटू चे राज्य सचिव कॉ.डॉ.विवेक माँटेरो व इतर कामगार कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

परिषदेचे प्रास्ताविक करीत कॉ.विवेक मॉन्टरो यांनी परिषदेचे मुख्य काम भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आपण कामगार संघटना म्हणून प्रत्यक्षात काय काम केले पाहिजेत यावर व्यापक चर्चा करून निर्णय घेणे असल्याचे सांगितले.

HMS चे निवृत्ती धुमाळ यांनी परिषदेचा ठराव प्रतिनिधी समोर ठेवला. १३० वर्षापासून संघर्षातून मिळालेले ४४ कायदे संपवून ४ नवीन लेबर कोड आणून कामगार वर्गालाच संपविण्याचा धोरण हे सरकार अवलंबवित आहे. असंघटित कामगारांच्या कल्याणकारी योजना बंद केल्या जात आहेत. त्याच वेळेस प्रसिध्दीपिपासू मोदी सरकार मात्र या महत्त्वाच्या गोष्टींपासून जनतेला कामगार वर्गाला धर्मांधेत अडकावित आहे. मात्र आपली कामगार संघटनांची ही जबाबदारी आहे की सरकारचे हे खरे स्वरूप कामगार वर्गाबरोबरच त्यांच्या परिवार व जनते पर्यंत पोहचविणे. यासाठी या परिषदेतील ठराव सर्व सभासद पर्यंत घेवून जाण्याचे काम आपल्याला करावे लागेल असे सूचित केले.

ठरावावर एकूण 10 प्रतिनिधींनी सहभाग घेतला. कार्यकर्त्यांचे विचार व मतपरिवर्तन झाले पाहिजे या करिता शेवटच्या सदस्यापर्यंत हा ठराव पोहचला पाहिजे या करिता सर्व कामगार संघटनांनी एकत्रित काम केले पाहिजे. युवा पिढीची साधने अर्थात सोशल मीडिया, व्हिडिओजचा अधिक प्रभावी वापर केला पाहिजे. 

आपण करीत असलेल्या संघर्षामुळे सरकारला काही किमान मागण्या मान्य कराव्या लागल्या, ही बाब त्यांच्या मनावर बिंबवली पाहिजे, अन्यथा या सरकारकडे लोकांवर प्रभाव पाडणारी अधिकाधिक साधने आहेत, आपली सर्वांची एकूण किमान 25 लाख सभासद संख्या व 10 हजार कार्यकर्त्यांची फौज हेच आपले शस्त्र आहेत. सर्व सामान्य जनतेत भाजपचा पोकळ दावा, भाजपने जनतेची केलेली फसवणूक जनतेच्या लक्षात आणून द्या.शिवाय आपली मजबुती असल्याचा विश्वास निर्माण करायला हवा तरच आपण विजयी होऊ. फक्त सरकार बदलले तरी धोरण बदलतील असे ग्राह्य न धरता आपला संघर्ष सुरूच ठेवावा लागेल.

गेल्या 10 वर्षात सरकारच्या कामगार विरोधी, कर्मचारी विरोधी धोरणाच्या विरोधात सातत्याने या देशातला कामगार वर्ग मुकाबला करत आहे. स्वातंत्र्यानंतर संविधानाने कामगारांना कायदेशीर हक्क अधिकार दिले हे सर्व अधिकार आणि संविधानच मोडून काढण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. 29 कामगार कायदे रद्द करून 4 लेबर कोड आणले आहेत. कामगार कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ही सर्वात गंभीर गोष्ट आहे. म्हणून कामगार, कर्मचाऱ्यांचे संविधानातील अधिकार सुरक्षित राहणार नसतील तर कामगार वर्गाचा शोषणमुक्तीचा लढा आपण पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. सरकारच्या माध्यमातून जो हल्ला होतोय ते जर आपल्याला हाणून पाडायचा असेल आणि कामगार वर्गाचे अधिकार टिकवून ठेवायचे असतील, 4 लेबर कोड जर रद्द करायचे असतील तर भारतीय जनता पार्टीचा पराभव करणे देशातील आणि महाराष्ट्रातील कामगार वर्गाची जबाबदारी आहे असे मत डॉ.कराड यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप कैलास कदम यांनी केले. भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्याचा ठाम निर्धार करीत परिषदेची सांगता झाली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय