Deepti Sharma : महिला प्रीमियर लीगच्या सीझन 2 मध्ये विजयी घोडदौड करत असलेल्या यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवत इतिहास रचला आहे. या लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारी स्टार फिरकीपटू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) ही पहिली खेळाडू ठरली आहे. Deepti Sharma made history in WPL
शुक्रवारी अरुण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध यूपी वॉरियर्सचा सामना रंगला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना यूपीच्या संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 138 धावा केल्या तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने 20 षटकांत 137 धावांवर सर्वबाद झाले. WPL च्या या लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारी स्टार फिरकीपटू दीप्ती शर्मा ही पहिली खेळाडू ठरली आहे. दीप्तीच्या या दमदार गोलंदाजीमुळे यूपी संघाने एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला आहे.
यूपी वॉरियर्सच्या दीप्तीने या सामन्यात 4 षटकात 19 धावा देत 4 विकेट घेतल्या आहेत. सलग दोन पराभवानंतर यूपीचा हा पहिलाच विजय आहे, तर सलग चार विजयानंतर दिल्लीचा हा पहिलाच पराभव आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्स अजूनही ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये, यूपी वॉरियर्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 1 धावांनी पराभव करून आश्चर्यकारक कामगिरी केली. यूपीच्या या विजयात संघाची दीप्ती शर्माने सर्वात मोठे योगदान दिले.
हे ही वाचा :
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा
ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका