Monday, May 20, 2024
Homeग्रामीणठाणे-पालघर जिल्ह्यात अनेक गावांत १६ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन;...

ठाणे-पालघर जिल्ह्यात अनेक गावांत १६ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन; जनतेच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष.

प्रतिनिधी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या देशव्यापी हाकेनुसार १६ जून रोजी ठाणे-पालघर जिल्ह्यांच्या तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, वाडा व शहापूर तालुक्यांतील अनेक गावांत निषेध करण्यात आला. 

         आपापल्या परिसरात लागू करण्यात आलेले नियम काटेकोरपणे पाळून आणि शारीरिक अंतर राखत, रस्त्यावर येऊन निषेध करण्यात असून इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख दिले पाहिजेत,

            सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे, मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे. शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा. बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा, राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा; कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय