Monday, May 20, 2024
Homeराजकारणसहकारी संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलल्या; प्रशासक नेमणार!

सहकारी संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलल्या; प्रशासक नेमणार!

महाराष्ट्र जनभूमी :- कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेत आणि आरोग्य आणिबाणीची परिस्थिती असल्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका ३ महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकारी संस्थांवर प्रशासकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

         राज्यात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थितीत नमूद करून, १३ मार्च २०२० च्या अधिसूचनेन्वये साथरोग अधिनियम -१८९७ च्या खंड २, ३ व ४ ची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक १४ मार्च, २०२० रोजीच्या अधिसूचनेन्वये संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी . नियम प्रसिध्द केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील कलम ७३ (क) मधील तरतूदीप्रमाणे राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. यानुसार या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

           कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थिमुळे राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती विचारात घेता विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या असणे आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय