Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनामाकप नेते मोहम्मद सलीम यांना कोरोनाची लागण

माकप नेते मोहम्मद सलीम यांना कोरोनाची लागण

कोलकत्ता : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज गेल्या चोवीस तासात जगभरातील देशांपैकी भारतात सर्वात जास्त ५२ हजार ९७२ कोरोना बाधित आढळले असून भारत जगात सध्या तीन नंबर वर आहे. या कोरोना बाधितांमधून राजकीय नेते सुद्धा सुटलेले नाही. आज सीपीएमचे नेते मोहम्मद सलीम यांचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार मोहम्मद सलीम यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मोहम्मद सलीम यांना कोलकात्ताच्या ईस्टर्न मेट्रोपॉलिटन बायपास (ई. एम. बाईपास) या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २०१४-२०१९ पर्यंत सलीम यांनी रायजंग मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील कोरोना झाला असल्याचे त्यांनी स्वतः ट्विटर द्वारे सांगितले होते. तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनाही कोरोना झालेला आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय