Friday, September 20, 2024
Homeताज्या बातम्याCovishield Vaccine: कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

Covishield Vaccine: कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

Covishield Vaccine : कोरोना महामारीच्या काळात जगातील अनेक कंपन्यांनी प्राणघातक कोविड-19 विषाणूपासून बचाव करण्यासाठी घाईघाईने कोविड लस तयार केली. त्यापैकी एक ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca होती. AstraZeneca आणि Oxford University यांनी संयुक्तपणे कोरोनाची लस विकसित केली आहे. जी युरोपमधील वॅक्सजाव्हरिया आणि भारतात कोविशील्ड (Covishield Vaccine) या नावाने बनवली गेली. आता या कंपनीने साईड इफेक्ट संदर्भात धक्कादायक खूलासा केला आहे.

कंपनीने ब्रिटीश न्यायालयात कबूल केले आहे की लस दिल्यामुळे, क्वचित प्रसंगी, लसीकरणानंतर रक्त गोठणे आणि प्लेटलेटची संख्या कमी होऊ शकते. या सोबतच ह्रदयविकाराच्या झटक्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. कोविशील्ड लस भारतातील पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली होती. आता कोविशील्ड लसीच्या (Covishield Vaccine) सुरक्षेच्या बाबींचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

बुधवारी (01 मे) जोखीम घटकांचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ वैद्यकीय समिती स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका सर्वाच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याशिवाय सार्वजनिक आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने सूचना जारी करण्याची मागणीही करण्यात आली.

वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, “भारतात कोविशील्डचे 175 कोटींहून अधिक डोस दिले गेले आहेत. कोविड 19 नंतर हृदयविकाराचा झटका आणि अचानक बेशुद्ध होऊन मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून कोविशील्डच्या दुष्परिणामांची चौकशी करण्यात यावी, असे म्हटले आहे. तसेच एम्स, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्लीचे संचालक आणि तज्ज्ञांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात यावा, असेही अर्जात म्हटले आहे.

Covishield Vaccine

अधिवक्ता तिवारी यांनी ज्या नागरिकांना, ज्या कुटुंबांना कोरोना लस घेतल्यानंतर गंभीर बाधित झालेल्या लोकांना, किंवा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी ‘लस नुकसान भरपाई प्रणाली’ स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी करण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख

लोकप्रिय