घोडेगाव : एकात्मिक बाल विकास योजना व साथी संस्थेच्या पुढाकाराने कोळवाडी (घोडेगाव) ता.आंबेगाव येथील अंगणवाडी मध्ये पोषण माह साजरा करण्यात आला. (Ghodegaon)
अंगणवाडीत बालकांचे पोषण आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून पोषण माह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश पालकांना आणि स्थानिक नागरिकांना ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी संतुलित आहाराचे महत्त्व सांगणे, विविध अन्नपदार्थ व त्यातील आवश्यक पोषक तत्वे यांची माहिती पालकांना देणे व मुलांच्या आहाराबद्दल जाणीवजागृती करणे हा होता. (Ghodegaon)
यावेळी उपस्थित पालक, स्तनदा माता, गरोदर माता यांना साथी संस्थेच्या समीर गारे यांच्यासह अंगणवाडी सेविका सुनंदा डगळे यांनी लहान मुलांसाठी पोषक आहार कसा द्यावा, तो कसा तयार करावा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये साथी संस्थेच्या समीर गारे यांनी सांगितले कि ‘निरोगी वाढ आणि विकासासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द असलेल्या विविध खाद्यपदार्थांचा व फळे, भाज्या आणि तृणधान्ये यांचा समावेश पालकांनी मुलांच्या आहारात करावा, बाहेरील खाद्यपदार्थ मुलांना देणे टाळावे.
अंगणवाडी सेविका यांनी सांगितले कि, ‘मुलांना मोबाईल पासून जास्तीत जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा, मुलांना परिसरात त्यांच्या आवडीचे खेळ खेळायला प्रोत्साहन द्यावे. तसेच त्यांची वैयक्तिक स्वच्छता व घराबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवावा. जेणेकरून मुलांना निरोगी व स्वच्छ वातावरण मिळेल.
यावेळी कोळवाडी – कोटमदरा च्या ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया मते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर डगळे, आशा वर्कर पूजा पारधी, अंगणवाडी सेविका सुनंदा डगळे, अंगणवाडी मदतनीस उषा डगळे, साथी संस्थेचे समीर गारे, सुप्रिया मते, दिपक वालकोळी यांच्यासह वस्तीमधील नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा :
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती
School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी