Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यआरोग्य अदालत : कोव्हीड लस कोव्हीड योध्दा आणि दारिद्र्य रेषेखालील जनतेसाठी पी.एम....

आरोग्य अदालत : कोव्हीड लस कोव्हीड योध्दा आणि दारिद्र्य रेषेखालील जनतेसाठी पी.एम. केयर्स फंडातून मोफत उपलब्ध करा – डॉ. अभिजित वैद्य

पुणे : कोव्हीडची लस आरोग्य रक्षक, पोलिस, सफाई कामगार, सार्वजनिक वाहतूक कर्मचारी, सैनिक आणि दारिद्र्य रेषेखालील जनतेसाठी केंद्र सरकारने पी. एम. केयर्स फंडातील पैसा वापरून मोफत उपलब्ध केली पाहिजे. तसेच पी.एम. केयर्स फंडातून सिरम इंस्टीटयूटला आर्थिक अनुदान देवून सर्वांसाठी या लसीचा प्रत्येक डोस केंद्र सरकारने  रु. ४०० ला उपलब्ध करावा. लॉकडाऊन, बेरोजगारी, महागाई आणि वाढते इंधन भाव यांनी होरपळलेल्या जनतेवर या लसीचा आर्थिक भार टाकू नये.’ अशी मागणी आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांनी केली. 

ते आरोग्य सेनेच्या ‘कोव्हीड आणि लस’ या विषयावर घेतलेल्या आरोग्य अदालतीच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. ही अदालत आरोग्य सेनेच्या मार्केट यार्ड येथील प्रबोधन सभागृहात १६ जानेवारी रोजी पार पडली.

‘ कोव्हीड ची लस जनतेने कोणतीही भीती आणि गैरसमज मनात न बाळगता घ्यावी. कोव्हीड महासाथ आटोक्यात आणण्यासाठीच नाही तर ती संपवण्यासाठी जनतेचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे आवश्यक आहे. भारतात उपलब्ध असणाऱ्या दोन लसींपैकी पुण्यातील सिरम इंस्टीटयूटची कोव्हीशिल्ड ही लस अधिक परिणामकारक आणि सुरक्षित आहे असे दिसते. सिरम इंस्टीटयूटने ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्ररा झेनेका यांच्या सहकार्याने तयार केली असली तरी तिचे बाकी संशोधन, चाचण्या आणि निर्मिती पुण्यातून झाले आहे. 

विज्ञानाचे तंत्रज्ञान हे वैश्विक असते, तिथे स्वदेशी आणि परकीय असा भेद नसतो. त्या अर्थाने सिरम इंस्टीटयूटची कोव्हीशिल्ड ही लस स्वदेशी मानावी लागेल. दंडात घेण्याची ही लस ७०% परिणामकारक आहे, ती २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानात साठवता येते आणि तिचे शेल्फ आयुष्य ६ महिने आहे. या लसीने फेज तीन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. हैदराबाद येथील भारत बायोटेक च्या कोव्हॅक्सीन या लसीला सरकारने परवानगी दिली असली तरी तिच्या फेज तीन चाचण्या अद्यापही पूर्ण न झाल्याने तिच्या सुरक्षिततेबद्दल अद्यापही पूर्ण खात्री नाही. 

या अदालतीत डॉ. वैद्य यांनी पॉवर पॉइंट च्या माध्यमातून सूक्ष्म जंत, विषाणू, प्रतिकार क्षमता, लस, लसीचे प्रकार, निर्मिती प्रक्रिया, चाचण्या, परिणाम, दुष्परिणाम यांच्या माहितीबरोबर जगभरातील उपलब्ध लसी, भारतातील लसींची तुलना मांडली. 

या अदलतीला आरोग्य सेनेचे लक्ष्मीकांत मुंदडा, प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, आशिष आजगावकर, वर्षा गुप्ते, प्रा. प्रमोद दळवी, अतुल रुणवाल, अॅड. संतोष म्हस्के, संतोष जाधव, रमाकांत सोनवणी, वरदेंद्र कट्टी, रश्मी वैद्य, शरद बेनुस्कर, हनुमंत बहिरट, संध्या बहिरट, मनोहर भंडारी, प्रकाश हगवणे, अनिल वैद्य उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय