Wednesday, January 15, 2025
HomeNewsइंदोरी येथे कोव्हीड लसीकरण शिबीर संपन्न

इंदोरी येथे कोव्हीड लसीकरण शिबीर संपन्न

मावळ : मौजे इंदुरी ता.मावळ येथे भारतीय जैन संघटना आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हीड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

‘ग्रामीण भागात आम्ही सलग दोन आठवडे कोव्हीड लसीकरण याविषयी प्रबोधन केले. नागरिकांच्या मनातील शंका, गैरसमज, भीती दूर केल्यामुळे ४१५ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला, असे संस्थेचे मावळ तालुका समन्वयक मोहन कांडेकर यांनी सांगितले.

भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुधाकर चाबुकस्वार यांनी सेवा दिली. इंदोरीच्या सरपंच कीर्ती पडवळ तसेच ग्रामपंचायत आणि आरोग्य कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मदत केली.


संबंधित लेख

लोकप्रिय