बारामती : आज दिनांक 27 डिसेंबर रोजी श्रमन फूड्स बारामती येथे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील विविध अधिकाऱ्यांनी भेट दिले. या योजनेचा लाभ युवा उद्योजकांनी घ्यावा, तसेच ग्रामीण भागातील अर्थचक्र अधिक गतिमान होण्यासाठी अन्नावर प्रक्रिया करणे काळाची गरज आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी युवा उद्योजक रोहन थोरात बीएससी( होर्टी) व रत्नदिप सरोदे बीएससी (अग्री ) उपस्थित होते.
श्रमन फूड्स ही बारामती मधील अग्रगण्य फळे आणि भाजीपाला निर्जलीकरण करणारी कंपनी आहे. यात चिकू, पेरू, आंबा, अननस, आवळा अश्या फळांवर तसेच कोथिंबीर, कारली, मेथी, पुदिना, कडीपत्ता, मोडची मटकी या वर्षभर साठवल्या जातील अश्या रीतीने प्रक्रिया केली जाते.
कृषी विभाग संचालक सुभाष नगरे म्हणाले की, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विविध
अन्नपदार्थ खाल्ले जातात. पण प्रक्रिये अभावी खूप अन्नाची नासाडी होते ती टाळण्यासाठी शेताच्या बांधावर गावातच जर उत्तम दर्जाचे प्रक्रिया केंद्र झाले तर निश्चितच शेतमालास चांगला भाव मिळेल. रेडी टू कूक आणि रेडी टू ईट अशा अन्नपदार्थास भविष्यात मोठी मागणी आहे. असे ते म्हणाले.
यावेळी संचालक कृषी विभाग महाराष्ट्र राज्य सुभाष नगरे, माजी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषी सहाय्यक सचिन खोमणे कृषी सहाय्यक सागर चौहान, तंत्र सहायक अधिकारी समाधान खोपडे हे उपस्थित होते.