Monday, February 17, 2025

जुन्नर : गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या 2 आरोपींना त्यांच्या म्होरक्यासह केले जेरबंद, मुद्देमाल जप्त

जुन्नर / रवींद्र कोल्हे : शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना आळेफाटा बसस्थानक शिवारातील सार्वजनिक स्वच्छता गृहाजवळ पंकज बाबाजी आहेर (वय २२ वर्षे) व अमीर मोहम्मद शेख (वय २४ वर्षे) हे दोघे पिस्तुल व काडतुसे विक्रीसाठी आलेले आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

आळेफाटा पोलिसांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,पुणे ग्रामीण”चे मितेश घट्टे,जुन्नर उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर,सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल अमित माळुंजे, निखिल मुरुंबकर, मोहन आनंदगावकर यांचे पथकाने साफळा लावला.

आरोपी पंकज बाबाजी आहेर व आमिर मोहम्मद शेख देघेही रा.रांध्ये, आळकुटी, ता.पारनेर, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांचेकडून अवैधरित्या जवळ बालगलेला गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण २७ हजर रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

या बाबत आळेफाटा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस हवालदार विनोद गायकवाड यांनी फिर्याद दिली. या वरून आळेफाटा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं.४१०/२०२१ नुसार भारतीय दंड विधान कलम ३(२५) व मुंबई पोलिस कायदा कलम १३५ अन्वये, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार अजित पोपट आवारी रा.रांध्ये, आळकुटी, ता.पारनेर हा पिस्तुल व काडतुसे पुरवणाऱ्या म्होरक्यांपैकी एक असून,त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर अनिल आवारी रा.ह.रा.कामोठो मुंबई मूळ रा.पारनेर जि.अहमदनगर हा फरार याचा पोलिस शोध घेत आहेत.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles