Monday, July 15, 2024
Homeशिक्षणप्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक सप्ताह जल्लोषात साजरा

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक सप्ताह जल्लोषात साजरा

चिंचवड : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विविध गुणदर्शन सप्ताह उत्साहात पार पडला. ऑफलाईन महाविद्यालये सुरू झाली आणि अभ्यासाबरोबर महाविद्यालयातील होणार्‍या प्रत्येक उपक्रमाचा विद्यार्थ्यांना आनंद घेता आला. 

गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रतिभा महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अर्चना गांगड व सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक गुणदर्शनांचे कार्यक्रम घेण्यात आले. 

या स्पर्धेत फॅन्सी ड्रेस, कार्टून डे, बॅक टू स्कूल डे, हॉलवीन डे, इन्स्ट्रुमेंटल डे, ट्रॅडिशनल डे, फनफेअर आणि मास्टर अँड मिस प्रतिभा या वेगवेगळ्या दिवसांमध्ये मुलांनी आपली कला सादर करून मनमुराद आनंद लुटला. तसेच टॅटू मेकिंग, मेहंदी, ब्रायडल मेकअप, मॅड ऍड, फेस पेंटिंग, वारली पेंटिंग, कूकिंग अशा विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. प्रत्येक दिनामध्ये आणि स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या परीक्षकांच्या परीक्षणातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. तसेच यावर्षीच्या मिस प्रतिभाचा मुकुट तन्वी भसे 11 वी विज्ञान हीने पटकावला तर 12 वी कॉमर्सच्या धनराज सली हा मास्टर प्रतिभाचा मानकरी ठरला. याशिवाय 12 वी कॉमर्सची रिचा चौहान आणि 12 वी सायन्समधील पुष्कराज कदम या दोघांनी बेस्ट औटफिटचा किताब मिळविला.

या सांस्कृतिक उत्सवास संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहून या सांस्कृतिक विविध कार्यक्रमाचा आनंद घेतला.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय