मुंबई : मकर संक्रांतीच्या पतंगबाजीच्या सणाला नायलॉन मांज्यामुळे (Nylon Kite String) दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोला आणि नाशिकमध्ये नायलॉन मांज्यामुळे दोघांचे गळे चिरले गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनू धोत्रे आणि किरण सोनावणे अशी त्यांची नावे आहेत. (Nylon Manja)
नाशिकमध्ये पाथर्डी फाटा देवळाली कॅम्प भागात सोनू धोत्रे (वय 25) हा दुचाकी चालवत असताना नायलॉन मांजा (Nylon Manja) गळ्याभोवती गुंतल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. सोनू गुजरातमध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर म्हणून कार्यरत होता आणि सुट्टीसाठी गावी आला होता.
अकोल्यामध्ये किरण सोनावणे (वय 40) बायपास फ्लायओव्हरवर गाडी चालवत असताना नायलॉन मांज्यामुळे त्याच्या गळ्याला जबर दुखापत झाली. रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यालाही वाचवता आले नाही.
Nylon Manja वर कठोर उपाययोजनांची मागणी
नायलॉन मांजा, ज्याला चायनीज मांजा म्हणूनही ओळखले जाते, यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या प्रकारातील अपघात वारंवार समोर येत असून त्यावर कठोर उपाययोजनांची मागणी होत आहे.
मकर संक्रांत म्हटली की पतंगबाजीचा आनंद अनेकजण लुटतात. पण हा खेळ काहींच्या जीवावर उठवल्याचं पहायला मिळत आहे.


हे ही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन
ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट
महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी
पुण्यात विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
सुंदर स्टेटस ठेवला अन् काही वेळातच भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार