Thursday, December 5, 2024
Homeग्रामीणनगरसेविका अश्विनी जाधव यांनी "त्या" मुलाच्या जगण्याला दिली गती

नगरसेविका अश्विनी जाधव यांनी “त्या” मुलाच्या जगण्याला दिली गती

चिखली : भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या नगरसेविका अश्विनी संतोष जाधव यांनी आज धनगर समाजातील अपंग मुलाला (ओंकार रामदास लकडे, यवत) तीन चाकी सायकल दिली.

सदर मुलगा आणि त्याचे आई वडील मेंढपाळ असून अलीकडे काही आठवडे त्यांची पाले चिखली येथे वास्तव्यास आहेत. त्या मुलाची माहिती कळल्यावर दूरवर भटकंती करताना चालत जाणाऱ्या या मुलांच्या प्रवासात हि सायकल उपयोगी होऊन त्याचे कष्ट कमी होतील.

 

या मुलाचे वय २ वर्षाचा असताना अपघातात त्याचा एक पाय गमवावा लागला. त्यानंतर ते आज पर्यंत तो आपल्या कुटुंबासह या गावातून त्या गावात जात असताना आज तो ९ वर्षाचा झाला असून चिखली जाधववाडी भागात मागील १ महिन्यापासून वास्तव्यास असून वासुदेव जाधव यांनी या मुलाची व्यथा प्रभागाच्या नगरसेविका अश्विनी संतोष जाधव यांना सांगितल्यानंतर आज या मुलाला तीन चाकी सायकल देण्यात आली.

 

अश्विनी जाधव यांनी कोव्हिड 19 महामारीच्या काळात वॉर्डातील गरीब जनतेला सलग तीन महिने जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले होते. त्याप्रसंगी संतोष जाधव, विशालभाऊ आहेर, वासुदेव जाधव, सुरेश जाधव, बन्सी जाधव, नामदेव जाधव उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय