औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज १२९ जणांना (मनपा ८५, ग्रामीण ४४) सुटी देण्यात आली असून आजपर्यंत ४१६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ३३४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा २०४, ग्रामीण १३०) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७६७२ एवढी झाली आहे. आजपर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण ३१७३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर २६ रुग्णांची (११ पुरूष, १५ महिला) वाढ झाली आहे.
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीमध्ये गंगापुरातील ५२ वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात पडेगावातील आमले गल्लीतील ४८ वर्षीय पुरूष, कैलास नगरात संत एकनाथ सोसायटीतील ५९ वर्षीय स्त्री अश्या तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.