Friday, November 22, 2024
Homeजिल्हाशहरी गरीब योजनेसाठी केशरी कार्ड वरील उत्पन्न ग्राह्य धरा - आम आदमी...

शहरी गरीब योजनेसाठी केशरी कार्ड वरील उत्पन्न ग्राह्य धरा – आम आदमी पार्टी

पुणेशहरी गरीब योजनेसाठी केशरी कार्ड वरील उत्पन्न ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ व आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पुणे शहरात शहरी गरीब योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना १ लाखाच्या उत्पन्न ग्राह्य धरण्यासाठी १ लाखाच्या आतील उत्पनाचा तहसील दाखला / गवनी विभागाची सेवा शुल्क पावती किंवा पिवळे रेशन कार्ड या कागद पत्रांची मागणी केली जाते. पण एक लाखचा तहसील दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक बुदंड सहन करावा लागत आहे, असेही म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्र शासनामार्फत केशरी शिधापत्रिका हि एक लाखाच्या आतील नागरिकांच दिले जाते जर ह्याच निणर्याचा आपण विचार केला तर जास्तीत जास्त पुणेकरांना याचा उपभोग घेता येईल व नागरिकांची तहसील कार्यालय मार्फत होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक होणार नाही.

तसेच जे पिवळी शिधापत्रिके साठी निकष लावत आहात तोच निकष केशरी शिधा पत्रिकेसाठी हि लावावा, असेही आम आदमी पार्टीचे प्रवक्ते अभिजित मोरे, सचिव गणेश ढमाले यांनी म्हटले आहे. 


संबंधित लेख

लोकप्रिय