Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याRahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. राहुल गांधी यांना रायबरेली मतदारसंघात त्यांना 6 लाख 84 हजार 598 मते पडली आहेत. या जागेवर भारतीय जनता पार्टीचे दिनेश सिंह हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 2 लाख 95 हजार 856 मते पडली आहेत. त्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) येथे 3 लाख 88 हजार 742 मतांनी आघाडीवर आहेत.

राहुल गांधी हे वायनाडमधूनही विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांना या जागेवर आतापर्यंत 6 लाख 47 हजार 445 मतं पडली आहेत. या जागेवर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवार अॅनी राजा या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अॅनी राजा यांना 2 लाख 83 हजार 23 मतं मिळाली आहेत. तर, भाजपचे के सुरेंद्रन हे तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांना 1 लाख 41 हजार 45 हजार मतं मिळाली आहेत.

रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी आणि जवळच्या अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा यांचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. किशोरी लाल शर्मा यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे.

इंडिया आघाडी सध्या 234 जागांवर पुढे आहे. तर, दुसरीकडे एनडीए 291 जागांनी आघाडीवर आहे. या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. या आकडेवारीनंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव

ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव

मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव

मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का

ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव

ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का

ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर

ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर

सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण

संबंधित लेख

लोकप्रिय