Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याPrajwal Revanna : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव

Prajwal Revanna : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव

Prajwal Revanna : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यावेळीही निवडणुकीच्या रिंगणात होता. त्यांच्यामुळे कर्नाटकातील एनडीए आघाडीला विशेषत: भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, असे मानले जात होते. अशात आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) चे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांचा पराभव झाला आहे.

हसन लोकसभा मतदार संघातून जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) चे नेते प्रज्वल रेवण्णा आणि काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल मैदानात होते. हसन या जागेवर काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल हे विजयी झाले आहेत. 16 वी फेरी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल हे एनडीएचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात 41,782 मतांनी आघाडीवर आहेत. श्रेयसला 6,12,448 मते मिळाली, तर प्रज्वलला 5,70,666 मते मिळाली आहेत.

Prajwal Revanna

प्रज्वल रेवन्ना हे कर्नाटकातील हसन मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या ए मंजू यांचा पराभव करून ही जागा जिंकली. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना आणि त्यांचा आमदार मुलगा एचडी रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर तो जर्मनीला गेला होता. नुकतीच त्याला अटक करण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील भाजपचा पहिला उमेदवार विजयी

ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का

ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर

ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर

सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण

मोठी बातमी : देशभरात मतमोजणी सुरू, पहा कोण आघाडीवर !

संबंधित लेख

लोकप्रिय