Friday, November 22, 2024
HomeNewsदसऱ्याआधी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार ; सीएनजी पीएनजी महागला !

दसऱ्याआधी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार ; सीएनजी पीएनजी महागला !

नवी दिल्ली : मुंबईकरांना (Mumbai CNG Rate Today) दसऱ्याच्या आधी महागाईचा मोठा झटका बसला आहे. सीएनजी ( CNG Rates ) आणि पीएनजीच्या ( PNG Rates ) किंमतीत मोठी वाढ करण्यात आलीय.सीएनजीचे दर प्रतिकिलो तब्बल 6 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे घरगुती गॅसची किंमत चार रुपयांनी वाढलीय. ऐन सणासुदीत सामान्य नागरिकांना आता महागाईची झळ बसणार आहे.

का वाढली किंमत?

मुंबई आणि परिसरामध्ये सीएनजी आणि पीएनजीचे वाढीव दर आजपासून लागू करण्यात आलेत. वाढीव दरांमुळे मुंबईत सीएनजीची किंमती 86 रुपये प्रति किलो झाली आहे. तर पीएनजी गॅससाठी 52.50 रुपये प्रतिकिलो इतका दर आकारला जाणार आहे. 1 ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या आयात किंमतीत तब्बल 40 टक्के वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींवर झालाय.

कुठे किती दर?

सोमवारी पुण्यामधील सीएनजीच्या दरातही 4 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे पुण्यातील सीएनजीचे दर हे 91 रुपये प्रतिकिलो झाले होते. त्यानंतर आता मुंबईतही सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीय.

संबंधित लेख

लोकप्रिय