Tuesday, May 7, 2024
HomeNewsप्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर रिलीज ; चाहत्यांच्या उत्साहावर विरजण...कारण !

प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर रिलीज ; चाहत्यांच्या उत्साहावर विरजण…कारण !

प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चाहते खूप दिवसांपासून या टीझरची वाट पाहत होते. मात्र टीझर आल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे . याचे कारण म्हणजे चित्रपटाचे VFX. आदिपुरुषच्या टीझरमध्ये, प्रभास, प्रभू रामच्या भूमिकेत दिसतोय.तर क्रिती सेनॉन (Kriti Senon) सीतेच्या भूमिकेत दिसतेय. त्यांच्यासोबत वानरसेनाही आहे. ही सर्व दृश्ये एखाद्या अ‍ॅनिमेशन चित्रपटातील वाटत असली तरी लाइव्ह अ‍ॅक्शन फिल्मची नाही.

VFX पाहताच युजर्सनी टीझरला ट्रोल करायला सुरुवात केली. दिग्दर्शक ओम राऊत यांनी ही चूक लवकर दुरुस्त करावी, असे यूजर्सचे म्हणणे आहे. अनेक युजर्सनी या टीझरच्या व्हीएफएक्सची खिल्ली उडवली असून याला टेम्पल रन गेम म्हटले आहे.

कार्टून नेटवर्क आणि पोगो सारख्या कार्टून चॅनेल्स या चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकत घेतील आणि लोकांना ते या चॅनेल्सवर बघायला मिळतील अशीही काहींनी खिल्ली उडवली. ‘आदिपुरुष’ संदर्भात #disappointed, #cartoon आणि #adipurushteaser सारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय