मुंबई : गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून नवीन बदल करण्यात आले असून व्यावसायिक गॅस सिलिंडर (Gas cylinder) 30 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे नवीन दर 1 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात कपात
गॅस कंपन्यांनी आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 30 रुपयांनी कमी केल्या आहेत. नवीन दरानुसार दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर आता 1,646 रुपयांना मिळणार आहे, जो याआधी 1,676 रुपयांना मिळत होता. मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,598 रुपये झाली आहे, याआधी तो सिलेंडर 1,629 रुपयांना मिळत होता. कोलकत्त्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1,756 रुपये झाली आहे, जे याआधी 1,778 रुपये होती. चेन्नईत आता 19 किलोचा सिलेंडर 1,809.50 रुपयांना मिळणार आहे.
घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल नाही
विशेष म्हणजे, घरगुती वापरात असलेल्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, चेन्नईत 818.50 रुपये आणि मुंबईत 802.50 रुपयांना किरकोळ विक्री होत आहे.
सर्वसामान्यांमध्ये संताप
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात न झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. व्यावसायिक गॅसच्या दरात कपात झाल्यामुळे छोट्या व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी घरगुती गॅस धारकांना याचा लाभ होत नाही, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप आहे.
दरम्यान, हे नवीन दर आजपासून लागू करण्यात आले असून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्यामुळे व्यावसायिकांना त्यांच्या खर्चात काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे
मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !
IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!
ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस
मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल
मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?
‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!
Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत तब्बल 102 जागांसाठी भरती
मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय
मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा