Friday, November 22, 2024
HomeNewsचिखली- घरकुल गृहप्रकल्प परिसरात आयोजित प्लोगेथोन मोहिमेत सुमारे 4 टन सुका कचऱ्याचे...

चिखली- घरकुल गृहप्रकल्प परिसरात आयोजित प्लोगेथोन मोहिमेत सुमारे 4 टन सुका कचऱ्याचे संकलन

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चिखली येथील घरकुल गृहप्रकल्प परिसरात आयोजित प्लोगेथोन मोहिमेत सुमारे 4 टन सुका कचरा गोळा केला. घरकुल, नेवाळे वस्ती व शरद नगर, चिखली येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सह शहर अभियंता रामदास तांबे प्रभाग अधिकारी सिताराम बहुरे यांच्यासह सुमारे 70 कर्मचारी सहभागी झाले होते. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल घर प्रकल्प व परिसरात प्लॅगेथोन मोहीम आयोजित करण्यात आली. यामध्ये सुमारे 4 टन सुका कचरा (प्लास्टिक, कागद) उचलून घेण्यात आला.

माजी नगरसेवक एकनाथ पवार, संत गाडगेबाबा जागृती मंचचे कार्यकर्ते यशवंत कण्हेरे, शिवानंद चौगुले, सुनील गाडे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक एस. एस. गायकवाड, आरोग्य निरीक्षक वाय. बी.फल्ले, भूषण शिंदे, जनवाणी व बीव्हीजी संस्थेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी तसेच महानगरपालिकेच्या स्वच्छताग्रह अभियान ब्रँड अँबेसिडर संगीताताई जोशी, घरकुल मधील सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर व नागरिक यांचा विशेष सहभाग होता. बर्डस इंटरनॅशनल स्कूल व मनपा शाळा कुदळवाडीचे सुमारे 150 विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय