Sunday, May 19, 2024
Homeराजकारणनक्षलवाद्यांनी भारतीय जवान राकेश्वर सिंह यांना सोडलं.

नक्षलवाद्यांनी भारतीय जवान राकेश्वर सिंह यांना सोडलं.

 

 

रायपूर : नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह यांना सोडून दिले आहे. या बातमीनंतर त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे. राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने सरकारचे आभार मानले आहेत. 

छत्तीसगडच्या बिजापुरात 3 एप्रिल रोजी जवानांवर हल्ला झाला होता. यानंतर नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांचं अपहरण केलं होतं. या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते तर अनेक जवान जखमी झाले होते.

नक्षलवाद्यांनी म्हटलं होतं की, 3 एप्रिलला 2 हजार भारतीय जवान हल्ला करण्यासाठी जीरागुडेम गावाजवळ पोहोचले होते. त्यांना रोखण्यासाठी हल्ला केला गेला होता.

“जवानाची प्रकृती चांगली आहे. नक्षल छावणीत मी त्याला पाहिले, तेव्हा त्याला दुखापती झाल्या होत्या. त्यावर उपचार देखील करण्यात आल्याचे एका पत्रकाराने म्हटले आहे. 3 एप्रिल च्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी जखमी अवस्थेत जवानाला पकडण्यात आले होते.”

नक्षलवाद्यांनी एका जवानाचं अपहरण केल्याचं देखील सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, सरकारने आधी मध्यस्थींच्या नावाची घोषणा करावी, त्यानंतर जवानाला सोडण्यात येईल. त्यानुसार सोडण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून समजते. तर नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे की, “आम्ही मानवतावादी दृष्टिकोनातून जवानाला सोडत आहोत.”

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय