नाशिक : ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नाशिक कडून शहरातील गरजू, गरीब विद्यार्थी जी १० वी व १२ वी पहिल्या प्रयत्नात पास होतात त्यांचा सत्कार व शैक्षणिक सहकार्य हे हुतात्मा स्मारक नाशिक येथे कऱण्यात आले.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नागार्जुन वाडेकर, डॉ. यशवंत साळुंखे व चंद्रप्रकाश कांबळे लाभले. Nashik
गरजवंत विद्यार्थांना सहकार्य करावे, शोषित पीडित विद्यार्थ्याना न्याय मिळवून देण्याचे काम गेले ८८ वर्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन करत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या कॉ.हेमू कलानी विद्यार्थी सन्मान सोहळा हा अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमूख अतिथी नागार्जुन वाडेकरानी विद्यार्थ्यांची सध्याची अवस्था व पालकांच्या जबाबदाऱ्या बद्दल संवाद केला. Nashik
पालकांची जबाबदारी व पाल्यांची जबाबदारी शिक्षण आहे व त्यात त्यांनी इतर गोष्टींना कमी महत्व द्यावे या बद्दल बोलले. यशवंत साळुंखे यांनी त्यांच्या जीवनातील संघर्षांबद्दल सांगितले. त्यांना आलेले अनुभव, कष्ट या बद्दल त्यांनी कथन केले. चंद्रप्रकाश कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या जबाबदारी यावर भाष्य केले. कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
यावेळी कष्टकरी वर्गातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन ओम हिरे, प्रास्ताविक कैवल्य चंद्रात्रे, व आभार प्रदर्शन अंकित यादवने केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय खजिनदार व राज्याध्यक्ष विराज देवांग लाभले.
यावेळी एआयएसएफ राज्य सहसचिव प्राजक्ता कापडणे, राज्य काऊन्सिल सदस्य तल्हा शेख, राणी जगधने, साक्षी लोखंडे, पारमी वाडेकर, अनन्या तोंडे, राहुल भुजबळ, रोहीत खारोडे, प्रणव काथवटे, लक्षीता देवांग, विनायक संत इ. होते.
हेही वाचा :
धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!
मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे
मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !
IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!
ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस
मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल
मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?
‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!