पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये बजाज ऑटो कंपनीच्या नव्या CNG बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला.
बजाज ऑटो कंपनीने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली आहे, यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. CNG BIKE
ही सीएनजी बाईक जगातील पहिली सीएनजी दुचाकी असल्याचा दावा बजाजकडून करण्यात आला आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारत अमेरिका, चीन नंतर तिसऱ्या क्रमांकाचा वाहन उत्पादक देश आहे. बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली आहे यामुळे सामान्य वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सीएनजी बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी. प्रदूषणमुक्त भारत हे आपले ध्येय आहे. त्याअनुषंगाने बजाज कंपनीची सीएनजी बाईक या ध्येयाला मोठा हातभार लावेल यात शंका नाही, बजाजच्या टीम वर्कचे त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. CNG BIKE
जगातल्या पहिल्या सीएनजी बाईकचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं. या बाईकमुळे दुचाकीस्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल. CNG BIKE
या बाईकची फ्रीडम 125 नावाने मार्केटमध्ये ओळख होणार आहे CNG चा वापर केल्यामुळे इंधन खर्चात 60 टक्क्यापर्यंत बचत होणार आहे. CNG बजाज फ्रीडम 125 मोटरसायकल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. CNG BIKE
डिजिटल मीटर, एलईडी हेडलाइट, आणि आरामदायी आसन आधुनिक सुविधांचा आहेत. एकाच वेळी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्याय उपलब्ध असलेली ही मोटारसायकल ग्राहकांना किफायतशीर किंमतीत कंपनी देणार आहे. PCMC
हेही वाचा :
जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी
नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी
मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत
ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?
गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर
धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म