नागपूर : शहरात एका रात्रीत 100-125 मिमी संततधार पावसाने शहरात सखल भागात पाणी साचले आहे. पुरामुळे शहरातील शाळांना सुटीही जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना तत्काळ मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. Cloud burst in Nagpur, administration on alert
शुक्रवार 22 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर रात्रभर ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नागपुरकारांची दाणादाण उडाली.
मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सिताबर्डी भागालाही पुराचा फटका बसला आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्बल 5 फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. नागरिकांना मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात ठेवल्या आहेत.