Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशहर काँग्रेसचा कार्यअहवाल प्रदेश कडे सादर करणार – गोपाळ तिवारी

शहर काँग्रेसचा कार्यअहवाल प्रदेश कडे सादर करणार – गोपाळ तिवारी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मागील दोन वर्षात दिलेले आदेश पश्चिम महाराष्ट्रातील दहा जिल्हा काँग्रेस कमिटीने कशा पद्धतीने पाळले आहेत. याविषयीचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मागील काळात झालेल्या विविध आंदोलने, सभा, बैठकांमध्ये कोणी किती योगदान दिले आहे याबाबतचा कार्य अहवाल घेऊन प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, निरीक्षक गोपाळ तिवारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. City Congress will submit the work report to the state – Gopal Tiwari

शनिवारी खराळवाडी, पिंपरी येथील शहर काँग्रेसच्या कार्यालयात गोपाळ तिवारी यांनी आयोजित केलेल्या बैठकी वेळी ते बोलत होते. 

यावेळी महीला काँग्रेस नेत्या श्रीमती शामला सोनावणे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप,  शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यु दहितूले, झोपडपट्टी सेल अध्यक्ष बी. बी. शिंदे, सेवादल अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष विजय ओव्हाळ, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे, डॉक्टर सेल अध्यक्षा डॉ. मनीषा गरुड, भाजी विक्रेते सेल अध्यक्षा गौरी शेलार, उपाध्यक्षा अर्चना राऊत, उमेश बनसोडे, व्यापारी सेल अध्यक्ष अमरजित सिंग पोठीवाल, भाऊसाहेब मुगुटमल, तारिक रिझवी, बाबा बनसोडे, सौरभ शिंदे, जुबेर खान, मेहबूब शेख, हरिश डोळस, गौतम ओव्हाळ, मिलिंद फडतरे, इरफान शेख, सतीश भोसले, पांडुरंग जगताप, उपस्थित होते.

तिवारी म्हणाले की, काँग्रेस कमिटी मध्ये विविध पदांसाठी दावे प्रति दावे केले जातात. हे काँग्रेसमध्ये अध्यापही लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. याचा अर्थ काँग्रेसची विचारसरणी मान्य असणाऱ्या नागरिकांची संख्या भरपूर आहे. परंतु आपण एखाद्या पदाला दावा करीत असताना यापूर्वी आपण पक्षाने दिलेले आदेश वेळोवेळी पाळले आहेत का? विविध आंदोलन मोर्चा बैठकांमध्ये आपण सहभागी झाले आहेत का ? ज्या पदांबाबत आपण दावा करीत आहोत त्या पदाची जबाबदारी पेलण्याची आपली क्षमता आहे का याची देखील सखोल माहिती घेऊन त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे, अशी ही माहिती तिवारी यांनी यावेळी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय