Wednesday, May 1, 2024
Homeराज्यसीटू चे ७ वे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न, कामगार विरोधी कायदे मागे...

सीटू चे ७ वे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न, कामगार विरोधी कायदे मागे घ्यावेत : डॉ.डी.एल. कराड

नांदेड : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीआयटीयू) चे सातवे जिल्हा अधिवेशन भोकर येथील सुपर गार्डन येथे दि.२५ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले. छ.शिवाजी चौक येथून हजारो कामगारांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली.

डॉ.आंबेडकर चौक येथील नूतन शाळेमध्ये भव्य सभा घेण्यात आली.स्वागत अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार बि.आर.पांचाळ हे होते तर सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉ. डॉ.डी.एल. कराड यांनी जाहीर सभेस संबोधित केले. तेव्हा डॉ. कराड म्हणाले की अच्छे दिनच्या नावाने भुलथापा देऊन सत्येवर आलेल्या मोदी सरकारने कामगार आणि जनविरोधी कायदे केले आहेत. ते कायदे मागे घयावेत अन्यथा सीटू देशभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला आहे. अधिवेशनाचे उदघाटन कॉ. विजय गाभने यांनी केले, यावेळी मंचावर सीटूचे राज्य खजिनदार कॉ.के.आर.रघु, जिल्ह्याचे प्रभारी कॉ.अण्णा सावंत,जनवादी चळवळीचे नेते कॉ.शंकर सिडाम, शेतकरी नेते कॉ.अर्जुन आडे, सिटू राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार, शेतमजूर युनियन चे राज्य सहसचिव कॉ.विनोद गोविंदवार आदींची उपस्थिती होती.

अधिवेशनाचे दुसरे सत्र सुपर गार्डन येथे पार पडले. यावेळी एकमताने नूतन जिल्हा कमिटी निवडण्यात आली असून अध्यक्ष पदी कॉ.उज्वला पडलवार तर सरचिटणीस पदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. दिलीप पोतरे, कॉ.शिवाजी गायकवाड, कॉ.कालिदास सोनुले, कॉ.शीला ठाकूर, कॉ.वर्षा सांगडे, कॉ.जनार्दन काळे, कॉ.सारजा कदम, कॉ.अनिल कराळे, कॉ.करवंदा गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय