Kangana ranaut : हिमाचलमधील मंडीमधून भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या (CISF) महिला जवानाने कंगनाला थप्पड मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत (Kangana ranaut) विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट UK707 ने भाजपच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला निघाली होती, तेव्हा सुरक्षा तपासणीदरम्यान तिची एका महिला शिपायासोबत वाद झाला. एका महिला जवानाने कंगनाला थप्पड मारल्याचा आरोप आहे. कुलविंदर कौर असे या थप्पड मारणाऱ्या जवानाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंगना चंदीगड विमानतळावरून दिल्लीला सुरक्षा तपासणीनंतर बोर्डिंगसाठी जात असताना सीआयएसएफ जवान कुलविंदर कौर आणि कंगना यांच्यात शेतकऱ्यांबद्दल चर्चा झाली. शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने शेतकऱ्यांबाबत काही वादग्रस्त वक्तव्य केलेली होती. त्यामुळे कंगनाच्या कालशिलात लगावल्याची माहिती आहे.
दरम्यान, कंगनाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपी सीआयएसएफ जवानाला ताब्यात घेण्यात आले असून कंगनाने सदर महिलेला नोकरीवरून काढून टाकण्याची आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…
फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती
बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार
मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा
जर्मनीत सततच्या मुसळधार पुरामुळे ६०० लोकांचे स्थलांतर
विशेष लेख : एनडीएकडे बहुमत मात्र इंडियाकडेही जनमत
Cashless mediclaim : तीन तासात दावे मंजूर करण्याचे आदेश (IRDAI)
मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !
रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा
नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव
कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी
ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !