IRDAI : कॅशलेस उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णाला उपचारासाठी वाट पाहावी लागत असे. तसेच डिस्चार्जसाठी खाजगी व सरकारी विमा कंपन्या (mediclaim policy companies) उपचाराची बिले मंजूर करताना वेळखाऊ प्रक्रिया अवलंबितात, काही कंपन्या उपचारास देखील मंजुरी उशीरा देतात. New Delhi news
परंतु यापुढे कॅशलेस उपचारांसाठी अधिकृत निर्णय एका तासाच्या आत घेणे तसेच तीन तासाच्या आत बिले मंजूर करण्याचे आदेश “भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण “(IRDAI) ने आरोग्य विमा कंपन्यांना नुकतेच एक परिपत्रक जारी करून दिले आहेत.
कॅशलेस उपचार उपलब्ध असतांनाही रुग्णाकडून काही वेळेला डिपॉझिट / रोख रक्कमेची मागणी रुग्णालयाकडून केली जाते. अशा वेळी पॉलिसी असतांनाही रुग्णाला अडचणींचा सामना करावा लागतो. या आदेशामुळे खाजगी हॉस्पिटल्स मधील कॅशलेस सेवा देताना कोणत्याही तांत्रिक अडचणी मुळे पॉलिसी धारकास कॅशलेस उपचार घेताना व डिस्चार्ज मिळवताना मोठा दिलासा मिळाला आहे.
मल्होत्रा समितीच्या अहवालाच्या शिफारशींनंतर, 1999 मध्ये, विमा उद्योगाचे नियमन आणि विकास करण्यासाठी एक स्वायत्त संस्था म्हणून विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ची स्थापना करण्यात आली. IRDA ची स्थापना एप्रिल 2000 मध्ये ही सरकारची कायदेशीर यंत्रणा विमा धारकांच्या हितासाठी कार्यरत आहे. Govt of India
त्यामुळे रुग्णालयातून रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला आरोग्य विम्याचा क्लेम सेटलमेंट मिळण्यासाठी आता थांबावे लागणार नाही, क्लेम सेटल होण्यास तीन तासांपेक्षा अधिक विलंब लागल्यास रुग्णालयाकडून आकारली जाणारी अतिरिक्त रक्कम विमा कंपनी भागधारकाच्या निधीतून उचलेल.
तसेच उपचाराच्यावेळी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास तात्काळ क्लेम सेटलमेंट करण्याची कार्यवाही करावी. तसेच रुग्णाचा मृतदेह तात्काळ रुग्णालयातून सोडवावा, असे या आदेशात म्हटले आहे. (Cashless claims within an hour and discharge from hospital in 3 hours says IRDAI’s master circular)
१०० टक्के कॅशलेस क्लेमवर लक्ष्य
‘इर्डा’ने सांगितले की, विमा कंपन्यांना १०० टक्के कॅशलेस क्लेम सेटलमेंट होईल, यासाठी स्वतःची यंत्रणा आपात्कालिन परिस्थितीत कार्यक्षम ठेवावी लागेल. विमाधारकाची विनंती आल्यानंतर एका तासात कंपनीने त्यावर कार्यवाही केली पाहिजे. कॅशलेस क्लेमसाठी ‘इर्डा’ने ३१ जुलै २०२४ पर्यंत विमा कंपन्यांना मुदत दिली आहे. विमा कंपन्यांनी कॅशलेस क्लेम तडजोड करण्यासाठी रुग्णालयात डेस्क स्थापन करावेत, असे म्हटले आहे. IRDAI NEWS
IRDAI चे महत्वाचे आदेश
-विमाधारकांना पॉलिसी कागदपत्रांबरोबरच ग्राहक सूचना पत्र द्यावे.
-पॉलिसी कालावधीत दावा न आल्यास पॉलिसीधारकांची विम्याची रक्कम वाढवावी किंवा प्रीमीयममध्ये सूट द्यावी.
-पॉलिसीधारकाने पॉलिसी रद्द करण्याचा पर्याय निवडल्यास उर्वरित कालावधीची रक्कम परत करावी.
याबाबत पॉलिसीधारकांनी जागृत रहावे, तसेच विमा धरकाच्या अधिकारा बद्दलची माहिती समजून घ्यावी, जेणेकरून भविष्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आरोग्य विम्यात झालेले महत्वपूर्ण बदल “आयआरडीए” च्या https://irdai.gov.in संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर उपलब्ध असून सविस्तर माहितीसाठी हे परिपत्रक जाणून घ्यावे, असे आवाहन “भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण “(IRDAI) ने केले आहे.


हेही वाचा :
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार
मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा
मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !
रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा
नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव
कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी
ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !