Monday, May 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Arogya Bharti : वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांतील 6830 पदांच्या भरतीस शासनाची मान्यता

मुंबई : आरोग्य क्षेत्रात नोकरीसाठी प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.ज्ञशासकीय वैद्याकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांकरिता ‘गट-क’ व ‘गट- ड’ या संवर्गातील मंजूर 6 हजार 830 पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. Arogya Vibhag Bharti

---Advertisement---

मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी विभागस्तरावर निविदा प्रक्रियाही राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, ‘क’ दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही या कंत्राटी भरतीमध्ये समावेश आहे.

कामगार विभागाच्या 14 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळांमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती. त्यासाठी नऊ संस्थांची नियुक्ती केली. मात्र, हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारने त्याची व्याप्ती थेट महापालिका, नगरपालिका, महामंडळांपर्यंत वाढवल्याने विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले. सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याचे दिसल्यानंतर हे ‘पाप’ महाविकास आघाडी सरकारचे असल्याचा आरोप करीत निर्णय रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी केली. 31 ऑक्टोबरला कंत्राटी भरती रद्द केल्याचा शासन निर्णय जाहीर झाला. (Arogya Bharti)

---Advertisement---

मात्र केवळ ‘त्या’ नऊ संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून अनेक शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती सुरूच असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यासाठी अनेक शासकीय विभाग त्यांच्या पातळीवर मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागवून कंत्राटी भरती करत असल्याचे समोर आले आहे. 12 जुलैला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय काढला असून 59 शासकीय वैद्याकीय महाविद्यालये आणि रुग्णालयामध्ये ‘गट-क’ व ‘गट- ड’ संवर्गातील 6 हजार 830 पदे बाह्यस्रोतामार्फत भरली जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांची निवड केली जाणार आहे.

कुशल, तांत्रिक पदांचाही समावेश (Arogya Bharti)

● शासकीय वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये ‘गट-क’ प्रवर्गातील 1730 तर ‘गट- ड’ प्रवर्गात 5100 पदांवर कंत्राटी भरती होणार आहे.

● ‘गट-क’मध्ये लघुलेखक, वाहन चालक, शस्त्रक्रियागृह सहायक, ग्रंथपाल सहायक, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा साहाय्यक, आरोग्य शिक्षक, लघुटंकलेखक अशा कुशल अणि तांत्रिक पदांचाही समावेश आहे.

● शस्त्रक्रिया गृहातील महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने कशी भरली जाऊ शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
google news gif

हेही वाचा :

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती

श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

---Advertisement---

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles