Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडChinchwad Vidhan sabha 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिंचवडमध्ये उद्या करणार ‘शंखनाद’...

Chinchwad Vidhan sabha 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिंचवडमध्ये उद्या करणार ‘शंखनाद’ ;

शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार
(Chinchwad Vidhan sabha 2024)


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची पहिलीच प्रचार सभा

कस्पटे वस्ती, काळेवाडी फाटा येथे सायंकाळी ६ वाजता होणार सभेला प्रारंभ
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार उपस्थित


सभेला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित राहण्याचे चिंचवडकरांना आवाहन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी (दि. ६) काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील अँबियन्स हॉटेल शेजारील मैदानात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही पहिलीच प्रचार सभा संपन्न होणार आहे. (Chinchwad Vidhan sabha 2024)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही या सभा होणार आहेत. या सभांचा शुभारंभ उद्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काळेवाडी फाटा येथील सभेतून होणार आहे.

या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय