Friday, May 17, 2024
HomeNewsप्रजासत्ताक दिनी स्केटिंग करत "यांनी" रचला अनोखा विक्रम !

प्रजासत्ताक दिनी स्केटिंग करत “यांनी” रचला अनोखा विक्रम !

प्रजासत्ताक दिनी बारामती येथे स्केटिंग करत मुलांनी केला अनोखा विक्रम

कीप ऑन रोलिंग स्केटिंग क्लबच्या मुलांची कामगिरी

बारामती/ क्रांतिवीर रत्नदीप :
बारामती येथील कीप ऑन रोलिंग स्केटिंग क्लब च्या वतीने सलग एक तास हातात तिरंगा ध्वज आणि पेटती मशाल घेऊन स्केटिंग करत ढोल ताशांच्या गजरात रेकॉर्ड करण्यात आला.स्केटिंग क्लबचे कोच तनिष्क शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा रेकॉर्ड नोंदवण्यात आला.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी 4 ते 14 वयोगटातील सुमारे 30 हून अधिक स्पर्धक तिरंगी फेटे घालून सहभागी झाले होते. या मुलांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महिला हॉस्पिटल रोडवर स्केटिंग करत रेकॉर्ड केला. यावेळी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी देखील हजेरी लावली होती.

हा रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया व ग्लोबल गिनिस रेकॉर्ड बुक साठी करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशस्तीपत्रके व पदके बहाल करण्यात आली.यावेळी पालक, कोच,विद्यार्थी तसेच पोलिस प्रशासनातील देशमुख मॅडम व सहकारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय