पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : स्त्री शक्ती महिला संघ संस्था, चिखली प्राधिकरण पेठ क्र.16 व हरिपाठ भजनी मंडळ गणेश मंदिर सेक्टर 16 राजे शिवाजी नगर चिखली प्राधिकरण संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी एकादशी निमित्ताने सालाबादप्रमाणे टाळ म्रुदुंग डोई तुळशी वृंदावन माता भगिनींनी हरिनाम गजर करीत गणेश मंदिर 16 सेक्टर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पायी दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीत महिला वयस्क महिला बाल गोपालांचा सहभाग उस्फूर्त सहभाग जाणवत होता.
यावेळी महिलांनी रिंगण करून विविध अभंगावर ठेका धरला होता. तरुणी तसेच अबाल वृद्ध महिला डोक्यावर तुळशीपत्र आणि विठ्ठल रुक्माई च्या मुर्त्या घेऊन नाचत होत्या. भगवा ध्वजधारी महिला वारकरी संप्रदायाची पताका घेऊन मिरवत होत्या. सर्वांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले होते. विठ्ठल नामाच्या गजराने सबंध परिसर भक्तीरसात नाहून निघाला.
या कार्यक्रमाचे संयोजन स्त्री शक्ती महिला संघ संस्था अध्यक्ष सिंधू किवळे, शैला मापारी, सुजाता आवटे, शारदा इंगळे, कविता राणे, सुनिता कार्ले व हरिपाठ भजनी मंडळ वृद्ध महिला कार्यकर्त्यांनी केले होते.
अलंकापुरीत आषाढी एकादशी दिनी लाखावर भाविकांची दर्शनास गर्दी
शहरालगत गहुंजे येथे क्रिकेट स्टेडियम असताना 400 कोटीचे मोशीत स्टेडियम ; उधळपट्टी कशासाठी ? नाना काटे यांचा सवाल
स्टॉर्म वॉटर जोडणी न केल्यामुळे चिखलीत (जाधववाडी) पाणी रस्त्यावर – स्थापत्य विभागाच्या गलथान कारभार – राजू भुजबळ