चिखली प्राधिकरणात आध्यत्मिक केंद्र विकसित करणार – राहुलदादा जाधव
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.30 – चिखली प्राधिकरण पेठ क्र.16 राजे शिवाजीनगर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात शेकडो भाविकांनी पहाटेची काकडारती केली.सामूहिक पूजा पार पडल्यानंतर महिलांनी विठ्ठल-रुख्माई मंदिरात महिला भाविकांनी अभंग आणि भजन सादर केले,शेकडो महिलांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्त्या मंगल जाधव यांच्या सहकार्याने संत सावता महाराज भाजी मंडई मधील सर्व भाजी विक्रेत्याकडून फराळाचे आयोजन करण्यात आले होते, उपस्थित सर्व भाविकांना उपवासाचा फराळ वितरण करून शुभेच्छा दिल्या.
चिखली प्राधिकरणात आध्यत्मिक केंद्र व विशाल सभामंडप विकसित करणार असल्याची माहिती माजी महापौर राहुल जाधव यांनी यावेळी दिली. चिखली प्राधिकरण पेठ क्र.16 हा मागील दशकपासून विकसित झालेले निवासी क्षेत्र आहे. वारकरी संप्रदायाची आवड असलेले राहुल जाधव यांनी नारायणपुरचे अण्णा महाराज यांचा आशीर्वाद घेऊन शालेय जीवनापासून सांस्कृतिक,धार्मिक आध्यत्मिक कार्यक्रम राबवायला सुरवात केली. नागपूरचे संजय महाराज पाचपोर यांच्या उपस्थितीत 2012 साली राम कथा वाचनाचा मोठा कार्यक्रम चिखली जाधववाडी परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर जाधववाडी येथे रामायण मैदान विकसित करण्यात आले.
पेठ क्र.16 राजेशिवाजीनगर येथील लोकमान्य प्रतिष्ठानच्या सहकार्याने व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 रोजी विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना करण्यात आली.येथील कामगार कर्मचारी बंधू, माता भगिनींच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक आनंद देणारे एक तीर्थक्षेत्र या ठिकाणी नावारूपास येईल, असा विश्वास राहुल जाधव यांनी व्यक्त केला.
अलंकापुरीत आषाढी एकादशी दिनी लाखावर भाविकांची दर्शनास गर्दी
शहरालगत गहुंजे येथे क्रिकेट स्टेडियम असताना 400 कोटीचे मोशीत स्टेडियम ; उधळपट्टी कशासाठी ? नाना काटे यांचा सवाल
स्टॉर्म वॉटर जोडणी न केल्यामुळे चिखलीत (जाधववाडी) पाणी रस्त्यावर – स्थापत्य विभागाच्या गलथान कारभार – राजू भुजबळ