Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणचांदवड : एस.एन.जे.बी अभियांत्रिकी महाविद्यालय, चांदवड येथे सीईटी परीक्षा सेंटरला मान्यता

चांदवड : एस.एन.जे.बी अभियांत्रिकी महाविद्यालय, चांदवड येथे सीईटी परीक्षा सेंटरला मान्यता

चांदवड (सुनिल सोनवणे) : चांदवड येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाचे श्री. नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयास या वर्षापासून प्रशासनाने इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षासाठीचे  सीईटी सेंटर सुरू करण्याची नुकतीच मान्यता दिली आहे.

हे परीक्षा सेंटर सुरू झाल्यामुळे सर्व विषयांची सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना या ठिकाणी देता येईल. परीक्षेसाठी चांदवड हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने चांदवड परिसरातील व कसमादे पट्ट्यातील  विद्यार्थ्यांची या केंद्रामुळे मोठी सोय होणार असून विद्यार्थी व सोबत येणाऱ्या पालकांचा परिक्षेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याचा वेळ व खर्चही वाचणार आहे, असे संस्थेच्या विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा व‌ झुंबरलाल भंडारी यांनी सांगितले.

सदर परीक्षा सेंटर सुरू व्हावे यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरवठा सुरु होता आणि आज त्यास यश मिळाले, असे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती यांनी सांगितले. विश्वस्त समितीचे सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी तसेच महाविद्यालयाचे समन्वयक सुनील चोपडा आदींनी सदर सीईटी सेंटर मंजूर झाल्याबद्दल  आनंद व्यक्त केला.

सदर सेंटरवर कोवीडच्या सर्व नियमांचे पालन करून सीईटी परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी महाविद्यालयातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी कोकाटे यांनी सांगितले. यासाठी उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. वडनेरे एस. एस. व इतर कर्मचारी यशस्वीतेसाठी  प्रयत्न करीत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय