Tuesday, September 17, 2024
Homeजिल्हाChandrapur : शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur : शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर येथे शेतात काम करीत असताना विद्युत प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपूर्वी तुटलेल्या विद्युत तारांमुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. मृत्यूमुखी पडलेले शेतकरी पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे आणि नानाजी राऊत अशी आहेत, तर एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. वन्यप्राणीपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने ही दुर्घटना घडली का, याबाबत चौकशी सुरू आहे.

Chandrapur

घटनेच्या तपासासाठी वीज केंद्राचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेचे नेमके कारण  समोर येणार आहे. दरम्यान, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून, तपासाच्या सूचनाही दिल्या आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

संबंधित लेख

लोकप्रिय