Friday, November 22, 2024
Homeहवामानराज्यात आजपासून 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता !

राज्यात आजपासून ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता !

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका / मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यामध्ये 7 ते 10 मार्च कालावधीत राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता असून कोकणात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण

भांडखोर सुन आहे, मग न्यायालयाचा ‘हा’ महत्वपूर्ण निकाल जरूर वाचा !

तसेच महाराष्ट्रासह गुजरात, पूर्व राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका / मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात चंद्रपूर, अहनदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. याठिकाणी तापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. काही ठिकाणी ढगाळ वतावरण झाल्याने सोमवारी काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

ओंकार रावणची ऑल इंडिया कयाकिंग स्पर्धेसाठी निवड !

संबंधित लेख

लोकप्रिय