पुणे, (दिपाली पवळे) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘योग प्रात्यक्षिका’चे आयोजन करण्यात आले होते. २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ ही संकल्पना घेऊन हा दिवस महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी नियमितपणे योग करण्याची प्रतिज्ञा घेतली. (International Yoga Day)
या दिनाच्या निमित्ताने आयोजित योग प्रात्यक्षिक यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी आपल्या जीवनामध्ये योग कशाप्रकारे महत्त्वाचा आहे हे सांगितले. स्वतःबरोबरच कुटुंबासाठी योग महत्त्वाचा आहे हे सांगताना आपल्या वैयक्तिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक, आत्मिक समाधानाची पूर्ती देखील योगसाधने मधून होत असते, हे यावेळी नमूद केले. योग हा विद्यार्थी, पालक, प्रौढ या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. या दिनाचे औचित्य साधून सर्वांनी योग करणे महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी मांडले. केवळ आजच्या दिवसापुरता योग न करता सातत्याने तो केला जावा यासाठी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक यांमार्फत योगाची प्रात्यक्षिके दिली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (International Yoga Day) निमित्ताने प्रा. अनिल मरे यांनी ‘आरोग्यासाठी योगसाधना’ या विषयावर व्याख्यान दिले. त्याचबरोबर आयोजित केलेल्या योग प्रात्यक्षिकांसाठी योग सादरीकरण करून उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. त्याचबरोबर सूर्यनमस्कार आणि मणक्याच्या व्याधी साठी उपयोगी असणाऱ्या योगाचे प्रकार, त्याचबरोबर व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले. प्रात्यक्षिक घेतानाही प्राध्यापक मरे यांनी आपण ज्या ज्या प्रकारांचे योग करतो त्यासाठी आपली शारीरिक तयारी प्रथमतः करावी लागते आणि योगा नंतर ते पुन्हा पूर्वावस्थेत आणणे महत्त्वाचे असते. याचेही प्रात्यक्षिक दिले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग प्रात्यक्षिक करणाऱ्यामधून उत्कृष्ट योग करणाऱ्या महिला प्राध्यापक, पुरुष प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले; तर आभार उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले.
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा
BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत
AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती
मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?
मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !