Saturday, May 4, 2024
Homeजिल्हावाढदिवस साजरा केला अनाथ बालकांना सुखाचा घास देऊन

वाढदिवस साजरा केला अनाथ बालकांना सुखाचा घास देऊन

पिंपरी चिंचवड : चिखली येथील एका उच्च विद्याविभूषित तरुणाने स्वतःचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांना गोड जेवण देऊन साजरा केला.

रोहन चव्हाण हा चिखली येथील चार्टर्ड आकाउंटन्ट युवकाने २१ व्या जन्मदिनी सोनवणे वस्ती चिखली येथील विकास अनाथ आश्रम येथील ५० किशोरवयीन मुलाबरोबर २१ वा वाढदिवस साजरा केला.

या मुलांना गोड जेवणाचा आस्वाद दिला.

रोहन चव्हाण म्हणाला की, मोठं मोठे केक कापून वाढदिवसाचे प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्येकाने जन्मदिनी या अनाथ बालकांना सुखाचा घास दिल्यास ईश्वराचे आशिर्वाद मिळतील.

आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदतरुपी सेवा करुन  त्याचं दुःख कमी करणं म्हणुन अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहे.

आश्रमाचे संचालक माऊली हरकाळ म्हणाले, मी गेली दहा अनाथांचा सांभाळ करताना काही मोजकेच तरुण इथे येऊन भोजनसेवा देत असतात. कारण हा आश्रम तुमचा माझा सर्वांचा आहे, येथील मुलामुलींचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम कोणीतरी येऊन करत असतो.

  

या वेळी रोहन चे मित्र रोहित सुदाम चव्हाण, श्रेयश अर्जुन जाधव, सिद्धेश भालेकर, मयुर काळे, ओंकार साने, गणेश गुंडाळे, हर्षल इधाटे, माधव गुंडाळे, ओंकार प्रकाश धायरकर हे उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय