Friday, May 17, 2024
Homeआंतरराष्ट्रीयचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरूद्ध कोरोना पसरल्याचा बिहारमध्ये गुन्हा दाखल

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरूद्ध कोरोना पसरल्याचा बिहारमध्ये गुन्हा दाखल

(प्रतिनिधी):- देशात कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी चीनला जबाबदार धरुन, अ‍ॅडव्होकेट मुराद अली यांनी बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील बेतियाह नगरमध्ये चीनचे अध्यक्ष आणि डब्ल्यूएचओ संचालक यांच्यासह अनेक अज्ञात लोकांविरूद्ध सीजेएम न्यायालयात खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी 16 जून रोजी होणार आहे.

      देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तेव्हापासून आतापर्यंत देशात 8 हजाराहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. जगातील बहुतेक देश या धोकादायक व्हायरससाठी चीनला दोष देतात.  भारतातील बहुतेक नागरिक कोरोनाला लॅब मध्ये तयार केलेला व्हायरस असल्याचे मानतात.

   दरम्यान, बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेटियाह नगरात चीनच्या या कृत्याबद्दल चिनी अध्यक्ष शी जिन पिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक यांच्यासह अज्ञात लोकांविरूद्ध बेटियाह सीजेएम कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      कोर्टाचे वकील मुराद अली यांनी हा खटला दाखल केला असून हा खटला स्वीकारत सीजेएम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 16 जून रोजी होणार आहे.  अ‍ॅडव्होकेट मुराद अली यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या प्रकरणात साक्षीदार केले आहे.

        चीनचे अध्यक्ष आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक यांनी कोरोना विषाणूचा जगभर फैलाव करण्याचा कट रचला असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. वकिलांनी कलम 269, 270, 271, 302, 307, 500, 504 आणि 120 बी आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संबंधीचे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय