Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडधम्मज्योती बुद्ध विहार तांदूळवाडी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

धम्मज्योती बुद्ध विहार तांदूळवाडी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

तांदूळवाडी (क्रांतिवीर रत्नदीप) : महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती तांदूळवाडी येथील धम्मज्योती बुद्ध विहार येथे पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्ध मूर्तीचे पूजन तसेच पूजा पाठ, वंदनेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित बौद्ध बांधवांची मनोगते झाली.बुद्ध विहाराला विद्युत रोषणाई करून, रांगोळी काढून सुशोभित करण्यात आले होते.

ॲड.योगेश सरोदे म्हणाले ,वैशाखी पौर्णिमेला बौद्ध धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुद्धाचा जन्म, बुद्धाला दिव्य ज्ञानप्राप्ती तसेच बुद्धाचे महापरिनिर्वाण आजच्या दिवशी झाले. क्षत्रियाचे काम युद्ध करणे हिंसा करणे आहे असे वेदात सांगितले, मात्र बुद्धांना हे तत्त्वज्ञान मुळीच मान्य नव्हते .त्यांनी प्रेम, करुणा, आणि शांतीचा संदेश देत मानव जातीला दुःखातून मुक्त केले.



भारत सरोदे म्हणाले ,अखिल मानव जातीला दुःखातून मुक्त करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मंगलमुखातून मानवाला तारणारा धम्म दिला. अंधश्रद्धा आणि कर्मकांड याला फाटा देऊन बुद्धांनी विज्ञानवादी धम्म जनमानसात रुजवला त्यामुळे 21 व्या शतकात देखील बुद्ध धम्म उपयुक्त वाटतो.



वानखेडे सर म्हणाले बुद्धांच्या धम्मामध्ये ऐक्य, एकता आणि सांघिक शक्ती आहे. सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन बुद्ध धम्माचे पालन केल्यास सार्वत्रिक सुखाचा अनुभव येतो. आर्य अष्टांगिक मार्ग आणि चार आर्य सत्य सांगून बुद्ध म्हणाले मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही. त्यामुळे बुद्ध धम्म हा आचरणाचा म्हणजेच जगण्याचा धम्म आहे.



भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष सुरज सरोदे यांनी देखील बुद्ध पौर्णिमेच्या उपस्थित धम्म बांधवांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास तांदुळवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय