Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुण्यातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी भारताला मिळाले अकरा सुवर्णपदक

पुण्यातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी भारताला मिळाले अकरा सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय साउथ एशिया कुंग फु चँपियनशिप मध्ये विजयी मुलांचे पुणे रेल्वे स्थानकात जल्लोशात स्वागत

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर
: गोवा येथील मनोहर पर्रीकर स्टेडियम मध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय साउथ एशिया कुंग फु चॅम्पियन स्पर्धेत पुण्यातील विद्यार्थ्यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली आहे.



त्यामुळे या विद्यार्थ्यानी तब्बल अकरा गोल्ड, चार कास्य व दोन रौप्य पदक भारताला मिळवून दिली आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील भारत, नेपाळ, भूतान, मालदीव, श्रीलंका या देशांचा सामावेश होता. या स्पर्धेत तायची, सांडा, ताऊल, तुईशू, सुईझाओ, विंगचुंन या खेळांचा प्रमुख सामावेश होता.


त्यांच्या या कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे. आज सकाळी सहा वाजता पुणेकर नागरिकांनी या मुलांचे हार, फुले, गुच्छ तसेच पेढे भरवीत पुणे रेल्वे स्थानकात अत्यंत जल्लोशात स्वागत करण्यात आले. यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनानी रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला होता.

संबंधित लेख

लोकप्रिय