Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडलाचखोर पोलीस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

लाचखोर पोलीस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक : मालेगाव तालुका पोलिस ठाणे चा पोलीस शिपाई करण गंभीर थोरात हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. गुन्हयाच्या तपासात मदत करण्याकरीता ४ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडला. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की, “तक्रारदार यांचे बहीणीविरूध्द मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासात मदत करण्याकरीता तक्रारदार यांचेकडे ४ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान मालेगाव तालुका पोलीस ठाणेचे पोलिस शिपाई करण गंभीर थोरात यांनी तक्रारदार यांचेकडे ४ हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दि . ०६ जून २०२३ रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या दक्षिणेकडील पार्कीगमध्ये स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले. त्यांचेविरुद्ध भ्र.प्र.का. सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र च्या पोलीस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती साधना भोये- बेलगावकर करीत आहेत. दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. त्यामुळे याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय