चिपळूण : कोकणात मुसळधार पाऊस पडत असताना एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. चिपळूण शहर वाशिष्टी आणि शिवनदी किनाऱ्यावरील कोकणातील मोठे व्यापारी शहर आहे. Chiplun
यामुळे समुद्रातून खाडीत येणाऱ्या मगरी अन्नाच्या शोधात शहर परिसरात फिरताना आढळतात. या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मगरींचा अधिवास आहे, उन्हाळ्यात पर्यटक मगरी पाहण्यासाठी येतं असतात, असे तेथील स्थानिक रहिवाशी म्हणतात. Chiplun
मात्र रविवारी रात्री चिंचनाका परिसरात ८ फूट लांबीची एक मगर रस्त्यावर गस्त घालताना एका रिक्षा चालकास दिसली.
सततच्या मुसळधार पावसामुळे नद्यांनाही पूर आला आहे. अशा परिस्थितीत ही मगर नदीतून बाहेर पडून मार्ग चुकल्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडीओमध्ये इतर अनेक वाहनेही जी मगरीला पाहून तिथेच थांबली आहेत. रिक्षाचालक मगरीचा पाठलाग करून त्याच्यावर हेडलाइट मारताना दिसत आहे. Chiplun
चिपळूण शहरात पावसामुळे शिव वाशिष्ठी नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या नदीत असलेली मगर रविवारी रात्री रस्त्यावर चुकून आली असल्याची शक्यता आहे.
चिपळूण शहर प्रशासन आणि वनविभागाने या मगरीला पुन्हा नदीत सोडण्यासाठी विशेष पथक काम करत आहे, अशी माहिती मिळत आहे, मात्र रात्री मगर रस्त्यावर मुक्त विहार करत असल्याचे व्हिडिओ पाहून नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!
मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे
मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !
IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!
ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस
मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल
मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?