तेहरान : इस्राएलच्या संभाव्य इराण वरील हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी रशियाने इराणला S – 400 हवाई संरक्षण प्रणाली दिल्याची माहिती “डिफेन्स सिक्युरिटी एशिया”ने एका रिपोर्ट मध्ये जाहीर केली आहे. (Breaking)
रशियाने इराणला लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली “मर्मान्स्क-बीएन”चा इराणला पुरवठा सुरू केला आहे. इराण आणि इस्रायलच्या वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने इराणच्या विनंतीनंतर S-400 हवाई संरक्षण प्रणाली ऑगस्ट 2024 मध्ये दिली आहे. (Breaking)
त्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि इतर रशियन बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा इराणला इज्रायल मोठा हल्ला करण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आला आहे.
इराण आणि रशिया गेली चार दशके एकमेकांची मित्र राष्ट्रे आहेत. युक्रेन युद्धात इराणने रशियाला घातक ड्रोन पुरवठा सुरूच ठेवला आहे. S-400 ही जगातील सर्वात अँडव्हान्स हवाई डिफेन्स प्रणाली असून भारत, चीन आणि तुर्की ला रशियाने ही प्रणाली दिली आहे. (Breaking)
इसरायल वर इराणने क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर रशियाने इराणला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे.
इसरायल लेबनॉन नंतर इराण विरोधात लष्करी कारवाई करण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रशियाने गेल्या ऑगस्ट पासून इराणला युद्ध सामुग्री आणि संभाव्य इराण इसरायल संघर्षात नियोजनपूर्वक पाठिंबा देणे सुरू केले असल्याचे रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.